नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे भव्य उद्घाटन येत्या २२ जानेवारी २०२४ ला होणार असून विरोधी पक्षांच्या नेत्यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या विरोधकांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे या सोहळ्यात प्रमुख पाहुणे असणार आहेत.
तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांनाही श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे. मात्र, या उद्घाटन सोहळ्याला काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आमि चौधरी यांना वयक्तिकरित्या निमंत्रण पाठवण्यात आले आहे. सोहळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आमि एचडी देवगौडा यांना देखील बोलवण्यात आले आहे. ट्रस्टच्या प्रतिनीधी मंडळाने हे निमंत्रण दिलं आहे. येत्या काही दिवसात इतर विरोधी पक्षातील नेत्यांना देखील निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे.
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राम मंदिर ट्रस्टच्या शिष्टमंडळाने अनेक विरोधी नेत्यांना आमंत्रणे दिली आहेत. दरम्यान, पुढील काही दिवसांत आणखी विरोधी नेत्यांना निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल, बसपा नेत्या मायावती, सीपीएम नेते सीताराम येचुरी आणि सीपीआयचे डी राजा यांचा देखील समावेश आहे.
या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत संबोधित करू शकतात. तसेच नव्या तीर्थक्षेत्रपुरममध्ये एक टेंट सिटी स्थापन करण्यात आली असून यामध्येअली सहा ट्यूबवेल, सहा स्वयंपाकघर, आणि दहा बेडचं रुग्णालयाचा देखील समावेश आहे. देशात तब्बल १५० डॉक्टर या रुग्णालयात एकापाठोपाठ एक अशा पध्दतीने सेवा देणार आहेत.