पुणे : अनोळखी महिलेसोबत बेडरूममधील अंतर्वस्त्रातील व्हिडिओ व्हायरल होताच सोलापूर भाजपाच्या एक दिग्गज नेत्याला पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
श्रीकांत देशमुख असे या नेत्याचे नाव असून भाजपच्या सोलापूर ग्रामीण विभागाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यांनी आज राजीनामा सोपवला.
व्हायरल विडिओत बेडरुममध्ये देशमुख हे अंतर्वस्त्रात बसलेले दिसून येत असून संबंधित महिला कॅमेरा समोर येऊन त्यांनी फसविल्याचे आरोप करत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर भाजपा आणि पक्षाच्या नैतिकते बद्दल उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे देशमुख यांनी राजीनामा दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर श्रीकांत देशमुख यांनी संबंधित महिलेले आपल्याला हॅनीट्रॅपमध्ये अडकविल्याची तक्रार मुंबई येथील ओशिवारा पोलिस स्टेशनला दिली होती.