मुंबई : एनआयएने केलेल्या छापेमारीत आठ जणांना बेड्या ठोकल्यात. एनआयए पथकाने देशभरात कारवाईचा धडाका लावलाय. आज महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये छापे टाकले. छापेमारीत केमिकल्स, संशयास्पद कागदपत्रे, रोख मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. महाराष्ट्रातील अमरावती, पुणे, मुंबई व कर्नाटकात, दिल्ली व झारखंड राज्यात एकूण १९ ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये आयसीसच्या आणखी एका म्होरक्याचा समावेश आहे. मिनाझ उर्फ सुलेमान असे नाव आहे. असा एनआयएने दावा केला असून तपासात निष्पन्न झालयं.
महाराष्ट्रात अमरावती, मुंबई आणि पुण्यात तर झारखंडमधील जमशेदपूर आणि बोकारो येथे धाडी टाकल्या. त्याशिवाय दिल्लीमध्येही छापेमारी केली आहे. छाप्यादरम्यान अटक करण्यात आलेले आठ आयसीस एजंट दहशतवाद आणि दहशतवादाशी संबंधित कृत्ये आणि प्रतिबंधित संघटना आयसीसच्या क्रियाकलापांना सक्रियपणे प्रोत्साहन देण्यात गुंतले होते. ते मिनाझ मोहम्मद सुलेमान यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होते.
छाप्यामध्ये सल्फर, पोटॅशियम नायट्रेट, चारकोल, गनपावडर, साखर आणि इथेनॉल यांसारखा स्फोटक कच्चा माल, धारदार शस्त्रे, बेहिशेबी रोकड आणि गुन्हेगारी कागदपत्रे, स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. ज्याचा वापर दहशतवादी कृत्ये करण्यासाठी केला जाणार होता. हे सर्वजण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य करत होते आणि जिहादच्या उद्देशाने मुजाहिदीनच्या भरतीशी संबंधित कागदपत्रे देखील प्रसारित करत होते. एनआयएने केलेल्या छापेमारीत मिनाज , मोहम्मद सुलेमान आणि सय्यद समीर यांना बल्लारी येथून, अनस इक्बाल शेख मुंबईतून, मोहम्मद मुनिरुद्दीन, सय्यद समिउल्लासामी, बेंगळुरूमधून मोहम्मद मुझम्मिल, दिल्लीतून शायान रहमान हुसेन आणि मोहम्मद शाहबाज झुल्फिकार, गुड्डू यांना जमशेदपूर येथून अटक करण्यात आली.