Karmala News : अरुण भोई / करमाळा : बुंडेलखंड विद्यापीठ झाशी येथे २ डिसेंबर रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये करमाळा तालुक्यातील टाकळी येथील डॉक्टर दिगंबर कवितके यांना असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट ऑफ इंडिया युवा शास्त्रज्ञ पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यामुळे करमाळा तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हा पुरस्कार असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पब्बी आणि सरचिटणीस डॉक्टर नमिता सिंग यांच्या हस्ते देण्यात आला असून, सध्या डॉक्टर कवितके हे असोसिएशन ऑफ फूड सायंटिस्ट अँड टेक्नॉलॉजिस्ट इंडिया, मायक्रोबायोलाँजिस्ट सोसायटी इंडिया असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट ऑफ इंडिया, सोसायटी ऑफ बायोलॉजिकल केमिस्टचे आजीवन सदस्य म्हणून काम करत आहेत.
डॉक्टर दिगंबर कवितके हे भारत आणि परदेशातील विद्यार्थी आणि संशोधन गटांना ते मार्गदर्शन करत आहेत. डॉक्टर दिगंबर कवितके यांचे माध्यमिक शिक्षण हे त्रिमूर्ती विद्यालय टाकळी येथे झाले असून, पुढील शिक्षण त्यांनी बारामती येथे घेतले. डॉक्टर कवितके यांना नॅशनल पास्टे डॉक्टरेट फेलोशिपच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिल्याबद्दल त्यांनी विज्ञान आणि अभियांत्रिक संशोधन मंडळाचे आभार मानले.