मुंबई : मुंबई महापालिकेकडून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नुकतीच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. अजिबात उशीर न करता इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही भरती विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही देखील पदानुसार असणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा ही घेतली जाणार नाहीये. उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 58 पदे ही या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज हे पाठवावे लागणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 डिसेंबर 2023 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) कार्यालय, पहिला मजला, व्होल्टास हाऊस समोर, डॉ. बी. आंबेडकर रोड, चिंचपोकळी मुंबई येथे अर्ज पाठवावी लागणार आहेत.
आरोग्य विभागात काम करण्याची ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. नोकरीचे ठिकाण हे मुंबईच असणार आहे. वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय एचआय व्ही पर्यवेक्षक, सांख्यिकी सहाय्यक, समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.