मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गेल्या चार वर्षांत संपूर्ण भारतात मनी लाँड्रिंगच्या विविध तपासासंदर्भात 69 हजार कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी संसदेत दिली. केंद्रीय मंत्रालयाकडून ही माहिती लेखी उत्तरात देण्यात आली आहे.
1 जानेवारी 2019 पासून ते चालू वर्षापर्यंतची ही यादी आहे. ईडीला चार फरारी लोकांना भारताकडे प्रत्यार्पण करण्यात यशस्वी झाली आहे. ही माहिती केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली आहे. या यादीत विजय मल्ल्या, नीरव मोदी, संदेसरा बंधू नितीन आणि चेतन आणि चेतनची पत्नी दिप्ती यांच्या नावांचा समावेश आहे.
गेल्या चार वर्षांमध्ये महसूल विभागाच्या अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 अंतर्गत 69,045.89 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे,” असे सिंग म्हणाले. ते भारतीय जनता पक्षाचे खासदार सुशील कुमार मोदी यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते, ज्यांनी गेल्या चार वर्षांत आर्थिक गुन्हेगार आणि फरारी लोकांकडून जप्त केलेली एकूण संपत्ती याविषयी प्रश्न उपस्थिती केला होता. 1जानेवारी 2014 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत, ED ने तात्पुरत्या स्वरूपात 1,16,792 कोटी रुपयांची आणि पीएंमपीएलए अंतर्गत 16,637.21 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे, असे सिंग यांनी आपल्या उत्तरात सांगितले आहे.