farmer suicided: नागपूर : जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 या 10 महिन्यांच्या काळात महाराष्ट्रमध्ये 2 हजार 478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. यामध्ये अमरावती विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्येची प्रकरणं समोर आली आहेत. सततची नापिकी आणि शेतमालाला भाव नसणं अशा कारणामुळं राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. राज्य सरकारनं विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याची कबुली दिली आहे. त्यासोबतच आकडेवारी देखील दिली आहे.
कोणत्या विभागात किती आत्महत्या?
अमरावती विभागात 951, छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागात 877, नाशिक विभागात 254, नागपूर विभागात 257, पुणे विभागात 27, लातूर जिल्हा 64, धुळे जिल्हा 28 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशा एकूण 2478 शेतकरी आत्महत्येची प्रकरण राज्यभरातून समोर आली आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर महिन्या दरम्यान समोर आल्याची माहिती लेखी उत्तरात राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
राज्यात विविध कारणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल, शेत मालाला भाव नसणे, राज्यात सततची नापिकी इत्यादी अनेक कारणास्तव मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अमरावती 637, औरंगाबाद 584, नाशिक 174, नागपूर 144, पुणे 16, लातूर 98, मराठवाडा 685, धुळे या व्यतिरिक्तही राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त भागाकडे शासनाने विशेष लक्ष देवून आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करावे. या आत्महत्या रोखण्यासंदर्भात शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे? असा सवालही करण्यात येत आहे.