लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील क्रीडा शिक्षक प्रा. राजू गुलाबराव काळभोर यांना जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कारने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराचे आजोजन खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघाच्या वतीने राजगुरू नगर (ता. खेड) येथील रद्दीसिद्धी मंगल कार्यालयात रविवारी (ता.१८) करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे यांच्या हस्ते राजू काळभोर यांना जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, संघाचे सचिव सचिव रामदास रेटवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजू काळभोर यांनी लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमरीवर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे क्रीडा शिक्षक म्हणून २००० साली पदभार स्वीकारला. २० वर्षाच्या कालावधीत त्यांनी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे. राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग, खोखो आणि कुस्ती स्पर्धेत विद्यालयाचे अनेक खेळाडू चमकले आहेत.
महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पुणे जिल्हा कुस्ती संकुलनात हवेली तालुकास्तर शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन सलग सात वर्षे केले. पृथ्वीराज कपूर मेमरीवर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे तालुकास्तर शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन सात वर्षे तर जिल्हास्तर खो खो स्पर्धेचे आयोजन एक वर्ष केले आहे. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांचे मार्गदर्शन मिळाले.
सहशिक्षक शिक्षण क्षेत्रात काम करत असतांना आपण अतिशय निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे आपल्या शाळेची त्याचप्रमाणे तालुक्याची व जिल्ह्याची शैक्षणिक व भौतिक गुणवत्ता वाढण्यास मदत झाली आहे. याचा खेड तालुका माध्यमिक शिक्षण क्षेत्रास सार्थ अभिमान आहे. म्हणून खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर संघाकडून राजू काळभोर यांना “जिल्हा गुणवंत शिक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दरम्यान, काळभोर यांच्या कार्याची दखल घरून याआगोदारच त्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कासगावडे आणि क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते यांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. काळभोर यांना हा पुरस्कार पुण्यातील सावित्रीबाई फुले वाडा गंज पेठ येथे नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
राजू काळभोर हे सध्या तासगाव (जि सांगली) पद्मभूषण डॉक्टर वसंत दादा पाटील महाविद्यालयात शिक्षण संचालक जुनिअर विभाग जिमखाना प्रमुख म्हणून काम पाहत आहे हे सर्व काम पाहत असताना त्यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व संस्थेचे अजीव सेवक प्राचार्य अरुण सुळगेकर व अर्थ सचिव प्राचार्य एस एम गवळी यांचे मार्गदर्शन मिळाले.