मुंबई: पुणे लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 10 महिन्यांमध्ये कोणतीही का हालचाली केल्या नाही, एखाद्या खासदारांच्या निधनानंतर इतके महिने जागा रिक्त ठेवणे अयोग्य असून लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अद्याप पोटनिवडणूक अद्याप झाली नाही. त्याबाबत आज मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगाला चांगलेच झापले.
The Bombay High Court today directed the Election Commission of India (ECI) to conduct by-election for Pune Lok Sabha constituency, which became vacant after the death of MP Girish Bapat on March 29.#BombayHighCourt @ECISVEEP pic.twitter.com/SYaSgeEz0x
— Bar & Bench (@barandbench) December 13, 2023
पुणे लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघाच्या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांमध्ये दोन्ही मतदार संघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता होती. पण जवळपास दहा महिन्यानंतरही निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची कुठलीही हालचाल झाली नाही. त्यामुळे या दोन्हीही जागा येत्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत रिक्त राहण्याची शक्यता होती. पण, आज मुंबई हायकोर्टाने पुण्याची पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश दिले. खासदार गिरीश बापट यांचे 29 मार्च रोजी निधन तर बाळू धानोरकर यांचं 30 मे रोजी निधन झाले होते. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपत आहे.