job recruitment : मुंबई : मुंबईत बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी बातमी आहे. थेट बँकेमध्ये तुम्ही नोकरी करू शकता. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. ही भरती प्रक्रिया आयडीबीआय बँकेकडून सुरू आहे. थेट आयडीबीआय बँकेमध्ये नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न नक्कीच साकार होऊ शकते. तुम्हाला idbibank.in या अधिकृत साइटला जावे लागेल. तिथे तुम्हाला या भरती प्रक्रियेसंदर्भात सर्व माहिती मिळेल. तिथे जाऊनच तुम्हाला या भरती प्रक्रियेचा अर्ज भरावा लागणार आहे. ही खूप मोठी संधीच तुमच्याकडे असणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 डिसेंबर 2023 आहे. 86 रिक्त जागांसाठी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करावेत. 86 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून महाव्यवस्थापक, असिस्टंट जनरल मॅनेजर, व्यवस्थापक अशी पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये.
रिक्त जागा – 86 रिक्त जागांसाठी उमेदवारांनी अर्ज करावे
अर्ज तारीख – अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 डिसेंबर 2023
शिक्षणाची अट -कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक
अर्ज करण्याची पद्धत – आॅनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता.
वयोमर्यादा -कमीत कमी 25 असणे आवश्यक
अर्ज शुल्क- 1000 हजार रूपये
अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवाराने सर्वात अगोदर idbibank.in या साईटला भेट द्यावी. तिथे तुम्हाला अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही बघायला मिळेल.