Iraq University Fire : उत्तर इराकमधील सोरनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. सोरन विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग लागली आहे. या अपघातात 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार ही घटना शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, या घटनेनंतर काही तासांतच आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. (14 students killed)
दरम्यान ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकलं नाही. जखमी झालेल्या विध्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सोरनच्या आरोग्य संचालनालयाचे प्रमुख कामराम मुल्ला मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार, इरबिलच्या पूर्वेकडील सोरन या छोट्या शहरातील एका इमारतीत आग लागली. सरकारी माध्यमांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे.(Iraq University Fire)
इराकच्या पंतप्रधानांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे
इराकचे पंतप्रधान मसरूर बरजानी यांनी या वेदनादायक घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पीडित कुटुंबांप्रती मला सहानुभूती असल्याचे ते म्हणाले. आम्ही या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.
At least 14 dead in fire at northern Iraq university dormitory, reports Reuters
— ANI (@ANI) December 8, 2023