Health Tips : मीठ हे आपल्या जवळपास सर्वच अन्नपदार्थांमध्ये वापरला जाणारा पदार्थ आहे. त्याने पदार्थ स्वादिष्ट, रूचकर बनवतो. पण याच मिठाचं अतिरिक्त सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. मिठात सोडियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळं व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा धोका असतो. त्यामुळं हृदयविकार आणि स्ट्रोकसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
सध्या असे काही लोकं आहेत त्यांना मिठाचं जास्त प्रमाणात सेवन करणं आवडतं. मात्र, हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. मिठात सोडियमच्या अतिप्रमाणामुळं अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामध्ये किडनीचे आजार, पोषकद्रव्यांची कमी आणि रोगप्रतिकारक क्षमता कमी होण्याचा धोका असतो. त्याचबरोबर शरीरात सोडियमचे द्रव प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांवर दबाव वाढून उच्च रक्तदाब होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका व रक्तवाहिन्यांचे रोग होऊ शकतात.
मिठाच्या अतिसेवनाने रक्तदाबाचा धोका जाणवतो. त्यामुळे अशा लोकांनी आहारात मिठाचं प्रमाण कमी ठेवायला हवं. याशिवाय फळं आणि हिरव्या पालेभाज्यांचं प्रमाण वाढवायला हवं. कारण त्यात पोटॅशियमचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळं रक्तवाहिन्यांना पुरेसा आराम मिळतो. वैद्यकीय तज्ज्ञांकडूनही अनेकदा मीठ कमी प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तसे केल्यास आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच फायद्याचे ठरू शकते.