मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत ६ मंत्री गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली आहे.
मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाची उपसमितीच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील असणार आहेत. या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे.
दरम्यान, ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल. असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.