पाचगणी : सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादनांचे नियम व नियंत्रण कायदा मोडल्याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात आणखी एका पर्यटकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पाचगणी, वाई ते महाबळेश्वर येथे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ सार्वजनिक ठिकाणी समीर सुरेश मलापुरे (वय ५६, रा. यशश्री कॉलनी, करवीर नगर, पुणे) हा धूम्रपान करताना आढळला. त्याच्याविरुद्ध सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने, जाहिरात, व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण नियम ओलांडल्याप्रकरणी सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सतिश रामचंद्र पवार (वय ५१ ) यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलिमा झोरे हे करीत आहेत.