Jalgaon Gold : जळगाव : दिवाळी नंतर सोने आणि चांदीने दरवाढीचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढले होते. सोने-चांदीतील ही दरवाढ ग्राहकांच्या उत्साहावर पाणी फेरणारी ठरली. मात्र जळगावातून सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची वार्ता आहे. सोने-चांदीचे गगनाला भिडलेले दर जळगावच्या सुवर्णनगरीत कमी झाले आहेत. सोन्याच्या दरात मंगळवारी एकाच दिवसात एक हजार 1300 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने 63 हजार रुपये प्रति तोळ्यावर आले. चांदीच्या भावात ही दोन हजार रुपयांची घसरला. चांदी 76 हजार रुपये प्रति तोळ्यावर आली आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
गुड रिर्टन्सननुसार , मंगळवारी 24 कॅरेट सोने 62,287 रुपये, 23 कॅरेट 62,038 रुपये, 22 कॅरेट सोने 57,055 रुपये झाले. 18 कॅरेट 46,715 रुपये, 14 कॅरेट सोने 36,438 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,383 रुपये झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. मात्र, सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
गेल्या आठवड्यापासून सोने चांदीचे भाव सतत वाढत आहेत. सोमवारी सोने 64 हजार 300 रुपये प्रति तोळ्यावर तर चांदी 78 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव वाढल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सट्टा बाजारात अचानक सोने-चांदी विक्रीला काढण्यात आले. त्यामुळे त्यांचे भाव कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.या परिणामामुळे मंगळवारी सोन्याच्या भावात 1300 रुपयांची तर चांदीत दोन हजार रुपयांची घसरण झाली.