नवी दिल्ली : सध्या ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोणतेही व्यवहार करायचे असल्यास ऑनलाईनलाच विशेष प्राधान्य दिले जाते. त्यात यूपीआय अर्थात ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ व्यवहारांनी नोव्हेंबरमध्ये नवीन उच्चांक गाठला आहे. व्यवहार 17.4 ट्रिलियन अर्थात 7.40 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
नोव्हेंबरची संख्या ऑक्टोबरमधील 17.16 ट्रिलियन रुपयांपेक्षा 1.4 टक्के अधिक आहे. हा व्यवहार 1.5 टक्क्यांनी घसरून 11.24 अब्ज झाला आहे, तर ऑक्टोबरमध्ये तो 11.41 अब्जच्या विक्रमी उच्चांकावर होता. नोव्हेंबर महिन्यात सणासुदीच्या हंगामामुळे व्यवहारांमध्ये आणखी वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये व्यवहारांची संख्या 10.56 अब्ज होती, ज्यांचे मूल्य 15.8 ट्रिलियन रुपये होते.
‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (NPCI)ने शेअर केलेल्या डेटानुसार, गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ते 54 टक्क्यांनी जास्त आणि मूल्यात 46 टक्क्यांनी जास्त होते. ऑक्टोबरमधील 320 दशलक्षच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये फास्टॅग व्यवहार किरकोळ वाढून 321 दशलक्ष झाले.