Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विमानतळाचा विस्तार ही सरकारची जबाबदारी; लोहगाव विमानतळाबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 4 December 2023, 9:31

पुणे : पुण्यातील लोहगाव येथील नागरी विमानतळ हवाई दलाच्या तळामध्ये आहे. यामुळे हवाई दलाचा तळ दुसरीकडे हलवून विमानतळाचा विस्तार करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, खंडपीठाने ही याचिका दाखल करून घेण्यास तसेच या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. याचिकाकर्त्याचा हेतू चांगला असू शकेल. पुण्याला मोठ्या विमानतळाची आवश्यकता आहे, हे आम्हाला मान्य आहे. मात्र, त्यांनी यासाठी योग्य यंत्रणेकडे दाद मागायला हवी, असे मत उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मात्र, विमानतळ उभारणे अथवा त्याचा विस्तार करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे सांगत न्यायालयाने या याचिकेवर पडदा टाकला आहे.

अनिरुद्ध देशपांडे यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायाधीश अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
याबाबत बोलताना खंडपीठ म्हणाले की, पुणे विमानतळाचे ठिकाण आणि हवाई दलाचा तळ कुठे असावा, या सरकारच्या कार्यकक्षेतील बाबी आहेत. त्यात न्यायालयाने हस्तक्षेप करणे योग्य नाही. विमानतळ कोठे असावे, हा निर्णय सर्वस्वी सरकारचा असेल. मात्र, सरकारी निर्णयामुळे कोणाच्या मूलभूत हक्कावर गदा येत असेल तरच आम्ही हस्तक्षेप करणार. हवाई दलाचा तळ दुसरीकडे हलवण्याबाबत विचार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला निर्देश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने यास नकार देत याचिकाकर्त्याला प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याची सूचना केली. त्यानंतर याचिकाकर्त्याने याचिका मागे घेतली.

दरम्यान, प्रशासनाने नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जागा ताब्यात घेतल्याची माहिती याचिकाकर्त्याला मिळाली होती. या प्रकरणी याचिकाकर्त्याने संबंधित सरकारी यंत्रणांसमोर सादरीकरण केले होते. नवीन विमानतळाच्या उभारणीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी आणि हवाई दलाचा तळ दुसरीकडे हलवावा, अशी मागणी यंत्रणांकडे करण्यात आली होती. मात्र, या मागणीला यंत्रणांकडून प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33
Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदूर्ग दौऱ्यावर; शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, नौदलाची प्रात्यक्षिकेही पाहणार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.