पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर शनिवारी सायंकाळी पु्न्हा एकदा विचित्र अपघात झाला. पुण्यातील भूमकर पुलावर पाच वाहनांना ट्रकने धडक दिली. तर एका कारला तब्बल दीड किलो मीटर फरपटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात चार जण जखमी झाले आहे. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही. जखमींना जवळील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर या भागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. (Pune Accident News)
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई बेगळुरू महामार्गावर पुण्यातील भूमकर पुलावर एका ट्रकने एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला धडक दिली. त्यांनतर एक पिकप, रेनॉल्ट कंपनीच्या एका कारला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यानंतर बाजूने जात असलेल्या एका कारला समोरून धडक देऊन कारला जवळपास दीड किलोमीटर फरपटत नेले. अपघातानंतर वाहनचालक भयभीत झाले.(Bhumkar Bridge Accident)
यादरम्यान महामार्गावरची वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. अपघात मोठी जीवितहानी टळली. मात्र चार जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान चारही वाहनांचा मोठं नुकसान झालं आहे. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेतले. तसेच या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.(Sinhagad Police)