पुणे : मायग्रेनचा त्रास होत असल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेल्या महिलेचा डॉक्टरकडून विनयभंग करण्यात आला आहे. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी मुकुंद नगर येथील बिजनेस कोर्टच्या सहाव्या मजल्यावर घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. श्रीपाद पुजारी या न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिला आंबेगाव बुद्रुक येथील एका सोसायटीमध्ये राहते. या महिलेला मायग्रेनचा त्रास होत होता. त्यामुळे ती तपासणीसाठी डॉ. पुजारी यांच्या क्लिनिकमध्ये आली होती. त्यावेळी पुजारी याच्या केबिनमध्ये कोणतीही महिला अटेंडंट नव्हती. ही संधी साधत डॉ. पुजारी याने या महिलेकडे बघून ‘तु एकटीच आली आहेस का? तू किती सुंदर व शांत आहेस. माझी राणी’ असे म्हणत तिला नको ते प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
तसेच महिलेच्या इच्छे विरोधात गालाला आणि अंगाला ठिकठिकाणी संमतीशिवाय अश्लील स्पर्श करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कीर्ती चाटे करीत आहेत.