Mumbai police Dog : मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाच्या एका स्निफर कुत्र्याने अपहरण केलेल्या सहा वर्षाच्या मुलाचा अवघ्या 90 मिनिटांत शोध घेतला आहे. 23 नोव्हेंबर रोजी हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाला होता. दरम्यान, बराच वेळ झालं तो घरी आला नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आणि शोधाशोध करायला सुरुवात केली. मात्र त्यांना तो कुठेच सापडला नाही, त्यामुळं त्याच्या मित्रांसोबत खेळाताना तो हरवल्याची तक्रार त्याच्या आईनं पवई पोलीस ठाण्यात दाखल केली होती. (Mumbai Police)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व येथील के बी एम कंपाउंड झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिला विमला फूलचंद कोरी यांचा सहा वर्षीय चिमुकला 23 नोव्हेंबरला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक गायब झाला. यामुळे त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपला सहा वर्षांचा मुलगा सापडत नसल्याबाबतची तक्रार दाखल केली होती.
यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पवई पोलिसांनीही तपास कार्याला सुरुवात केली होती. झोपडपट्टीचा परिसर असल्याने त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले नव्हते. त्यामुळे बेपत्ता असलेल्या मुलाचा शोध घेणे पोलिसांनाही कठीण जात होत. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, घराबाहेर खेळायला जाण्यापूर्वी मुलाने कपडे बदलले होते. याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांनी लिओला आणले आणि त्याला मुलाचा टी-शर्ट शिवण्यासाठी दिला. मुलाचा टी-शर्टचा वास घेतल्यानंतर लिओने त्याचा शोध सुरू केला. काही मिनिटातच कुत्र्याने मुलाला शोधून काढले. लिओ नावाच्या कुत्र्याला शहरातील उपनगरीय अंधेरी (पूर्व) भागातील अशोक नगर झोपडपट्टीत अपहरण झालेला मुलगा सापडला. अपहरण केलेल्या व्यक्तीचा पोलीस तपास करत आहेत.
#WATCH | ‘Leo’ – the sniffer dog of the Mumbai police’s Bomb Disposal and Detection Squad’s (BDDS) sniffer dog traced a kidnapped six-year-old boy in the Andheri (East) area. Due to the absence of CCTV cameras in the area, police took the help of the dog squad. The sniffer dog… pic.twitter.com/0aHFokMBey
— ANI (@ANI) December 1, 2023