Weight Loss Workout : पुणे : आजकालप्रत्येक जण आपल्या वाढत्या वजनाबाबत चिंतेत असतो. त्यांच्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण तासंतास जीममध्ये जाऊन घाम गाळतात. एवढंच नव्हे तर खाण्या-पिण्यावरसुद्धा नको तितकं नियंत्रण ठेवून डायटिंग केलं जातं. मात्र, तरी सुद्धा त्याच्या पदरी निराशाच पडते. प्रत्येक व्यक्तीसाठी निरोगी वजन असणे खूप आवश्यक आहे.
हिवाळा ऋतू आला आहे आणि या ऋतूमध्ये लोकं त्यांच्या आरोग्याबाबत थोडे अधिक जागरूक असतात. निरोगी आहार आणि व्यायामासाठी थंडीचा काळ उत्तम मानला जातो. अलीकडे १२-३-३० चा व्यायाम खूप लोकप्रिय झाला आहे आणि बरेच लोक ते फॉलो करत आहेत. पण हा व्यायाम केल्याने वजन झपाट्याने कमी होऊ शकतो का? हे आज पाहूयात..
१२-३-३० हा ट्रेडमिल वर्कआउट आहे. या वर्कआऊटनुसार ट्रेडमिलवर ठराविक वेळेसाठी ठराविक वेगाने वर्कआउट करून तुम्ही खूप चांगले परिणाम मिळवू शकता. हा वर्कआउट महिनाभर सतत केल्याने तुम्हाला एक महिन्यानंतर तुमच्या शरीरात बरेच बदल दिसून येतील. हा वर्कआउट देखील खूप शक्तिशाली मानला जातो.
मध्यम चालण्याचा वेग आणि झुकाव असलेला हा कमी प्रभावाचा व्यायाम आहे, त्यामुळे सांधेदुखी असलेल्या किंवा अगदी तंदुरुस्त नसलेल्या कोणाच्याही नुकसानीची शक्यता कमी असते. १२-३-३० व्यायाम हा वजनावर नियंत्रण ठेवू इच्छिणाऱ्या किंवा हृदय मजबूत करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आहे.