Health Tips: सध्या हिवाळा ऋतू जरी सुरु असला तरी वातावरण बदलत आहे. अनेकदा दुपारी कडक उन्ह तर कधी अचानक पाऊस हे गेल्या एक-दोन दिवसांपासून जाणवत आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
नाहीतर आजारांनाही एकप्रकारे आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला आलेला ताप हा व्हायरल आहे की नाही, हे ओळखायचं कसं याची आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
वातावरण बदलाचा सर्वात जास्त फटका वयोवृद्धांना बसत आहे. पण असे असले तरी फक्त वयोवृद्ध नाही तर अगदी सर्वच वयोगटातील लोकांना याचा त्रास होत आहे.
त्यामुळे जर तुमच्या स्नायूंमध्ये वेदना आणि सांधेदुखी, डोकेदुखी, थकवा जाणवत असेल किंवा घसा खवखवणे, नाक गळणे इतकेच नाहीतर शरीराचे तापमान 104 अंशांपर्यंत वाढणे यांसारखी लक्षणे दिसल्यास तुम्हाला व्हायरल ताप असल्याचे समजून जावे.
तसेच डोळे लाल होणे, त्वचेवर पुरळ येणे, चेहऱ्यावर सूज येणे, डिहायड्रेशन, अधूनमधून थंडी वाजणे यांसारखी लक्षणेही दिसल्यास तुम्हाला व्हायरल फिव्हर अर्थात व्हायरल ताप असल्याचे दिसून येईल. व्हायरल ताप असलेल्या रुग्णांना अनेकदा संपूर्ण शरीरात विशेषतः स्नायूंमध्ये वेदना होतात.
रुग्णांना अनेकदा डोकेदुखी होते, विशेषतः तापानंतर डोकं जास्त दुखतं. काही रुग्णांना तापासह त्वचेवर लाल रंगाचे पुरळ येतात, अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावे, असे केल्कणार आहे.