दौंड, ( पुणे ) : दौंड तालुक्यातील पूर्व भागातील खानवटे येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारले असून याचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. खानवटे येथील भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ व ज्येष्ठ नागरिक महिला संघची स्थापना २६ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आली होती. दोन्ही शाखेसाठी विरंगुळा केंद्राचे उदघाटन दौंड -शिरूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे अध्यक्ष व प्रादेशिक विभाग संपर्क सचिव डॉ. पांडुरंग श्रीपतराव लाड व खानवटे ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजना ढवळे यांंच्या हस्ते संपन्न झाले.
ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने खानवटे येथे विरंगुळा केंद्रात जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
यावेळी सरपंच ग्रामपंचायत खानवटे यांना विरंगुळा केंद्रास जागा उपलब्ध करून देणे बाबत २० ऑक्टोबर रोजी स्थानिक अध्यक्ष व दौंड-शिरूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती यांचेकडून मागणी करण्यात आली होती. यास ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने तात्काळ प्रतिसाद देत विरंगुळा केंद्रास जागा उपलब्ध करून दिल्याने सर्व प्रथम ग्रामपंचायत खानवटे प्रशासन, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचे डॉ. पांडुरंग लाड यांनी आभार मानले.
ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय सुविधा संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा परित्यक्ता,आरोग्य योजना यांसह ज्येष्ठ नागरिक आई – वडील चरितार्थ कल्याण कायदा २००७ – २०१० या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी कुटुंबातील सर्वांचेच सोनेरी/आयुष्य मान,आभाकार्ड गावातील अंगणवाडी सेविका अथवा सेतूच्या मार्फत काढुन घ्यावेत असे आवाहन केले. आरोग्य योजनेतील संपुर्ण पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील हॉस्पिटलची यादी उपस्थित त्यांना देण्यात आली त्यांना दिली.
यावेळी नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ पाटसचे सभासद मच्छिंद्र बापुराव काळे,बबन पर्वतराव भागवत,अशोक बाबुराव पवार,ज्ञानोबा गणपत हळंदे, खानवटे ग्रामपंचायतचे उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नामदेव पवार, उपाध्यक्ष उत्तम लोखंडे, सचिव अर्जुन शिरसट, कोषाध्यक्ष लालासाहेब कन्हेरकर, महिला अध्यक्षा लता जाधव, उपाध्यक्षा पुष्पा पवार, सचिव शशिकला लोखंडे, कोषाध्यक्षा वंदना ठणके यांसह ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व ग्रामपंचायतचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.