मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 ची तयारी सुरू झाली आहे. संघांनी त्यांच्या खेळाडूंची रिलीज आणि कायम ठेवण्याची यादीही जारी केली आहे. या संदर्भात हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स संघ सोडला आहे. तो मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला आहे. पांड्या बाहेर पडताच गुजरातने संघासाठी नवा कर्णधार निवडला आहे. गुजरातने युवा फलंदाज शुभमन गिलला (Shubman Gill) कर्णधार बनवले आहे. गुजरात टायटन्सनेही त्याची अधिकृत घोषणा केली आहे.
वास्तविक हार्दिक पांड्याला मुंबईने ट्रेड केले आहे. पांड्याला 2022 मध्ये गुजरातचा कर्णधार बनवण्यात आले होते. पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ चॅम्पियनही झाला. गुजरातने पांड्याला आयपीएल 2024 साठीही कायम ठेवले होते. पण मुंबईने त्याला ट्रेंड केले. मुंबईने गुजरात टायटन्सशी करार केला आहे. हा व्यवहार रोखीने झाला आहे. त्यामुळे पांड्याच्या बदल्यात मुंबईला गुजरातला पैसे द्यावे लागणार आहेत.
???????????????????????????? ???????????????? ????#AavaDe pic.twitter.com/tCizo2Wt2b
— Gujarat Titans (@gujarat_titans) November 27, 2023
पांड्या बाहेर पडताच संघाने शुभमनला कर्णधार बनवले. शुभमनची आतापर्यंतची कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा अप्रतिम कामगिरी दाखवली आहे. यासोबतच त्याने आयपीएलमध्येही चमक दाखवली आहे. शुभमनने आतापर्यंत 91 सामने खेळले आहेत. या कालावधीत 2790 धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये 3 शतके झळकावली आहेत. यासोबतच त्याने 18 अर्धशतकेही केली आहेत. त्याची सर्वोत्तम आयपीएल धावसंख्या १२९ धावा आहे.
IPL ने हार्दिक पांड्या आणि कॅमेरून ग्रीनची माहिती शेअर केली आहे. आयपीएलने सांगितले की, हार्दिक पांड्याला मुंबईने ट्रेड केले आहे. तर कॅमेरून ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने खरेदी केले आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्रीनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 16 सामने खेळले आहेत. या कालावधीत 452 धावा केल्या आहेत. यासोबतच 6 विकेट्सही घेतल्या आहेत.