पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, महापारेषणमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 2541 पदे भरली जाणार असून, यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
महापारेषणमध्ये विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) या पदासाठी भरती केली जात आहे. यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्रात कुठंही नोकरी करावी लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
- पदाचे नाव : विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली).
- रिक्त पदे : 2541 पदे.
- वयोमर्यादा : किमान वय १८ वर्षे व कमाल वय ३८ वर्षे. [मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांना: उच्च वयोमर्यादा ५ वर्षांनंतर शिथिल असेल.
- नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र.
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
- परीक्षा शुल्क : खुल्या प्रवर्गात उमेदवारांसाठी: रु.६००/-, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांसाठी: रु.३००/-, दिव्यांग व माजी सैनिक: कोणतेही अर्ज शुल्क आवश्यक नाही.
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 20 नोव्हेंबर 2023.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2023.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितासाठी अधिकृत वेबसाईट https://mahatransco.in/ वरून माहिती घेता येणार आहे.