Pune Rain Update : दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागामध्ये तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. आज रविवारी २६ नोव्हेंबरला पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. संध्याकाळी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लावल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अशातच शहरातील अनेक भागात वीज गायब झाली आहे.
शहरातील या भागात मुसळधार सरी
- कात्रज
- बालाजी नगर
- आंबेगाव
- न्हरे
- धनकवडी
- कोथरूड
- बाणेर
- स्वारगेट
शिरूर तालुक्यात शिरूर तालुक्यात
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सविंदने परिसराला आज सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने झोडपलं. या गारपिटीच्या पावसाने शेतीमालाचं प्रचंड नुकसान झाले. कांदा, मिरची, गहू यांसह इतर तरकारी मालांना या गारपिटीचा मोठा फटका बसला असून, सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.