युनूस तांबोळी
शिरूर : गोल गोल कुंडा भोवती फिरणारे फेसाळणारे पाणी आणि कुकडी नदीच्या किनारी येणाऱ्या पाण्याच्या लाटा मंदिराभोवती फिरणारे पक्षी त्यातून कुंड पर्यटन स्थळ पुर्ण पाण्याने झाकून गेल्याने पर्यटकांना हे दृष्य पहाण्यासाठी पर्वणी निर्माण झाली आहे. त्यामुळे अहमदनगर – पुणे जिल्ह्याच्या सिमेवरील कुंड पर्यटन स्थळावर पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळेच या ठिकाणच्या दृष्यांची सेल्फी तर श्री मळगंगा देवीच्या दर्शनासाठी भावीक व पर्यटकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
कुकडी नदीच्या पात्रात जगप्रसिद्ध कुंड पर्यटन स्थळ हे नवल पहावयास मिळते. या ठिकाणच्या किनाऱ्यावर दोन्ही बाजूला श्री मळगंगा देवीचे देवस्थान हे राज्यातील भावीकांचे कुलदैवत आहे. त्यामुळे राज्यातून या ठिकाणी भावीक नेहमीच दर्शनासाठी गर्दी करताना दिसतात. बेसॅाल्ड जातीच्या दगडात पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांजणखळगे निर्माण झाले आहेत. हे पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. उन्हाळ्यात या ठिकाणी हे रांजणखळगे उघडे पडल्यावर पर्यटक गर्दी करताना दिसतात.
या वर्षी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कुकडी नदीच्या पात्रात १० हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले. हे पाणि मोठ्या प्रमाणात असल्याने कुकडी नदीच्या दोन्ही कडांना पाणी लागले आहे. त्यातून कुंड पर्यटन स्थळ पाण्याने झाकून गेले आहे. येथे असणाऱ्या झुलत्या पुलावरून हे पाणि पहाण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. परीसरात होणारा मोठा पाऊस आणि नदी पात्रात सोडलेले पाणि यामुळे या परिसरात निसर्गाने आगळेवेगळे रूप धारण केले आहे.
सावधान जरा जपून :
कुकडी नदीच्या किनारी असणारे हे रांजणखळगे अतिशय प्रेक्षणीय व मनमोहून टाकणारे आहेत. या ठिकाणी पावसाच्या पाण्याने शेवाळाची घसरण निर्माण झालेली आहे. पावसाचे प्रमाण व पर्यटकांची गर्दी पहाता या ठिकाणी पाण्यात कोणीही उतरू नये. या पात्रात पुर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून सावधान…जरा जपूनच या ठिकाणी हा निसर्गाचा अनमोल ठेवा पहावा. येथे या अगोदर देखील अनेक दुर्घटना घडल्या असल्याने भावीक व पर्यटकांनी काळजी घ्यावी.
या वर्षी पावसाचे प्रमाण वाढले असून शंभर टक्के धरण क्षेत्रात पाणी भरल्याने नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. कुकडी नदीत १० हजार क्युसेस ने तर घोडनदीत २२ हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या नदीची पात्रे पाण्याने भरून वाहत आहेत. त्यामुळे काहि ठिकाणी पुलावरून पाणि जात असल्याने प्रवाशांनी येथील पुलावरून प्रवास करू नये. त्याशिवाय नदी किनारी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दत्तात्रेय कोकणे उपविभागीय अभीयंता पाटबंधारे विभाग