Big Boss 17 : मुंबई : बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकीमध्ये होणाऱ्या वादावर विकीच्या आईने भाष्य केलं आहे. एवढंच नाही, अंकिताने विकीला चप्पल फेकून मारल्याच्या प्रकारावरही त्या संतापलेल्या दिसल्या. त्या म्हणाल्या, “तुम्ही घरी असताना एकमेकांशी इतके छान वागत होतात, आता का एवढे भांडत आहात.” यावर अंकिता म्हणाली, “मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन.” यावर विकीची आई अंकितावर चिडून म्हणते, “नाही, तू काही सांभाळत नाही आहेस”,असं म्हणताना विकीची आई दिसत आहे.
कपल जोडीमुळे सध्या ‘बिग बॉस १७’चांगलेच चर्चेत आहे. यंदाच्या पर्वात बराच ड्रामा आणि ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घऱात अंकिताने प्रेग्नन्सी टेस्ट केली होती. या टेस्टमुळे अंकिता गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अंकिताच्या या टेस्टचा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टवरून अंकिता गरोदर नसल्याचे सिद्ध झालं आहे. बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन त्यांच्यातील भांडणामुळे चांगलेच चर्चेत आहेत. दोघांमध्ये अनेकदा खटके उडताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच अंकिताने विकीला चप्पल फेकून मारली होती. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
नुकताच बिग बॉसचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. येत्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये अंकिता व विकीची आई येणार आहे. दोघेजण त्यांच्या आईंना पाहून भावूक झाले होते. व्हिडीओमध्ये आई आणि सासूला बघून अंकिता रडताना दिसत आहे. “आई तुमची खूप आठवण येत आहे” आणि “तुमच्यावर खूप प्रेम आहे”, असे म्हणताना दिसत आहे. तर अंकिताची आई तिला “तू खूप सक्षम आहेस आणि सक्षमपणे खेळूनच या घराच्या बाहेर निघ’, असा सल्ला देताना दिसत आहे.