दीपक खिलारे
milk price protest : इंदापूर : दुधाला प्रती लिटरला ४० रुपये दर मिळावा या मागणीसाठी शहरातील बाबा चौकात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या वेळी रस्त्यावर दूध ओतून देत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी काही वेळासाठी इंदापूर शहरातून जाणारा जुना पुणे-सोलापूर मार्ग रोखून धरण्यात आला होता. याचबरोबर रस्त्यावर दूध ओतून देत सरकारच्या दुधाविषयीच्या धोरणांचा आंदोलकांनी निषेध नोंदवला.
या संदर्भातील आंदोलनकर्त्यांचे निवेदन इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि मंडल अधिकारी हगारे यांनी स्विकारले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.