पुणे : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित अर्जांचा कालमर्यादेत निपटारा व्हावा, यासाठी जिल्हयात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर प्रलंबित सर्व प्रकरणांचा आढावा घेऊन मोहीम स्वरुपात निपटारा करण्याचे निर्देश तहसिलदार पिंपरी चिंचवड व महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.
त्यानुसार या शिबिराचे सोमवारी (ता. १९) अपर तहसिलदार पिंपरी चिंचवड कार्यालया अंतर्गत वडमुखवाडी, पुणे आळंदी रोड, ता. हवेली येथील चंद्रफुल गार्डन (गोखले मळाशेजारी) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आयोजन करण्यात आले आहे.
सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा निपटारा व्हावा, यासाठी हा सेवा पंधरवडा राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या सेवा पंधरवड्यात महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आपले सेवा सर्कल पोर्टल, सेवा हमी कायदा अंतर्गत देण्यात येणारी सर्व प्रमाणपत्र, ४२ब सनद, ७/१२ बाबतचे आदेश, फेरफार निर्गती, प्रलंबित प्रकरणे, अर्ज इत्यादी कामकाज करणेत येणार आहे. त्यासाठी आहे सदर शिबीराचे वेळी नागरीकांना उपस्थित राहून शासनाच्या या योजनांचा लाभ घ्यावा असे जाहीर आवाहनहि अपर तहसिलदार पिंपरी चिंचवड व महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.