कोल्हापूर : तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता चारशे रुपये देण्यासाठी स्वाभिमानीने एल्गार पुकारला आहे. पुणे बंगळूर महामार्गावर कोल्हापुरात पंचगंगा नदी पुलावर हजारो शेतकरी एकवटले आहेत. तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता चारशे रुपये देण्यासाठी स्वाभिमानीने एल्गार पुकारला आहे. कोणतीही दखल घेण्यात न आल्याने कोल्हापुरात पुणे-बंगळूर महामार्गावर चक्काजाम करण्यात येत आहे. आंदोलनासाठी हजारो शेतकरी रास्त्यावर उतरले आहेत.
यावेळी शेतकऱ्यांमध्ये राजू शेट्टी यांनी जेवण घेतले. तसेच बसलेल्या पंगतीमध्ये वाडपीची भूमिका सुद्धा निभावली. यावेळी आंदोलनाला बसलेल्या हजारो शेतकऱ्यांनी हायवेवर बसून जेवण केले. पंचक्रोशीतील गावांनी शेतकऱ्यांच्या जेवणाची सोय केली. आंदोलनस्थळी जेवण करून वाढण्यात आले. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आंदोलनाला भेट देत पाठिंबा जाहीर केला. दरम्यान हायवेवर चक्काजाम केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून कोल्हापूर शहरातही वाहतूक खोळंबली आहे.