नवी दिल्ली: भारत सरकार आरोग्य मंत्रालयाने चीनमध्ये लहान मुलांमध्ये पसरणाऱ्या गूढ आजारावर लक्ष ठेवून आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, चीनमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझा प्रकरणांसह श्वसन रोगांच्या समूहापासून भारताला धोका होण्याची शक्यता कमी आहे. यासोबतच आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी भारत सज्ज आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक प्रेस निवेदन जरी करत म्हटले आहे की, ते उत्तर चीनमधील मुलांमध्ये H9N2 प्रकरणे आणि श्वसन रोगांच्या क्लस्टरच्या प्रसारावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये श्वसनाच्या आजारांच्या घटनांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये चीनमध्ये H9N2 (एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस) चे प्रकरण समोर आल्यानंतर, त्याच्या तयारीबाबत डीजीएचएसच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली, ज्याचा अहवाल WHO ला देण्यात आला.
सध्या भारत कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक आरोग्य आणीबाणीसाठी तयार आहे. अशा सार्वजनिक आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारत एक आरोग्य दृष्टिकोनावर काम करत आहे. कोविड महामारीनंतर भारतातील आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत झाल्या आहेत.