अजित जगताप
सातारा : माणसाच्या मनात जिद्ध असले की, त्यांना प्रगती करण्यासाठी अनेक मार्ग मोकळे केले जातात. त्यातून गरुड भरारी मारण्यासाठी आकाश सुध्दा कमी पडते. अशा माणसांची नोंद समाज घेत असतो.अशा मध्ये दुष्काळी भागातील आदरणीय यशस्वी उधोजक तथा मा. आ.प्रभाकर घार्गे यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हितचिंतक व निस्वार्थी पणे प्रेम करणाऱ्या जनतेच्या मनातील भावना ओळखताना,, हा सामान्यांचा नेता आणखी मोठा व्हावा.त्यांच्यावर सदैव कृपादृष्टी राहावी अशी सदिच्छा व्यक्त केली जात आहे.कार्यकर्त्यांना जपणारे नेते अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
खटाव तालुक्यातील दुष्काळी भागात निसर्गाने साथ दिली नाही. हीच संधी समजून अनेक हिररत्ने निर्माण होत आहेत. याचा अर्थ मातीच्या गोळ्याला आकार देण्यासाठी मूर्तिकाराची नजर असावी लागते. तशी नजर माजी आमदार केशवराव पाटील, जेष्ठ नेते शरदचंद्र पवारसाहेब यांची होती व आहे . ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील सदस्य प्रभाकर घार्गे यांची गुणवत्ता ओळखून त्यांना महाराष्ट्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी या दोन मातब्बर नेत्यांनी सहकार्य केले.
काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीनंतर प्रभाकर घार्गे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अपक्ष म्हणून सातारा जिल्हा बँकेचे संचालक म्हणून आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नंतर चौकार मारणारे संचालक झाले आहेत. ही त्यांच्या कार्याची पोहच पावती ठरली आहे.अपक्ष असूनही विकास सेवा सोसायटीच्या मतदारसंघात खटाव तालुक्यात नवा पायंडा पाडला आहे. ‘श्री घार्गे यांनी डाव जिंकला’ असे त्याचे वर्णन केले जात आहे.
पळशी येथल सौ कुसुम व देवबा घार्गे यांनी प्रभाकर म्हणजे सुर्याचा उदय करून सामाजिक बांधिलकी व सहकार चळवळ गतीमान केली आहे. श्री घार्गे साहेब यांनी पश्चिम महाराष्ट्रात ग्रामीण भागातील सर्व पक्षीय सर्वसामान्यापासून ते देशाच्या राजधानीतील नेत्यापर्यंत सलोख्याचे संबंध निर्माण केले आहेत. उदयोग क्षेत्रातील कूपर घराण्यातील तसेच इतर अनेक उधोगपती यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवून त्यांनी हजारो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.
दिलखुलास स्वभाव, दिलदार वृत्ती व मदतीसाठी सदैव तत्पर असणारे श्री घार्गे साहेब म्हणजे हुकमी एक्का ठरले आहेत.अर्थकारण, सहकार व राजकारण तसेच समाजकारण या चार आघाडीवर त्यांनी यशस्वीपणे पदार्पण करून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ग्रामीण भागात जिथे कार्यकर्त्यांना साधे सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य होताना अनेकांची मर्जी सांभाळावी लागते. त्याच ग्रामीण भागातून आलेल्या प्रभाकर घार्गे यांनी सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून बिनविरोध आमदार होण्याची किमया करून एक आदर्श युवकांपुढे दिला आहे.विधिमंडळ सभागृहात जेवढी प्रश्न विचारले.
अनेकदा महत्वपूर्ण चर्चेत सक्रिय सह भाग घेतला. पण, कधी ही अतिरंजित प्रसिद्धीची हाव धरली नाही.काही लोकप्रतिनिधी ची आज काल बँकेत विथड्रॉ स्लिप भरून पैसे खात्यातून काढल्यासारखे निधी मंजूर झाल्याची पत्रकबाजी वाचताना श्री घार्गे साहेबांच्या कार्याचे मनापासून कौतुक वाटू लागले आहे. सर्वसामान्याचे आप्पा ते साहेब या प्रवासात नशिबाची साथ तर कधी संघर्ष करावा लागला आहे. आज ही काही प्रसंगातून संघर्ष सुरू आहे.
उमेदीच्या काळात मुंबईतील पैसे छापणाऱ्या टंकसाळ कंपनीत कामाला लागले. पैसे निर्माण करू शकतो मग, पैसे ही कमवू शकतो. हा आत्मविश्वास वाढला. त्यातून त्यांच्यातील उधोजक जागा झाला. नोकरी सोडून साबण निर्मिती केली. पण, स्वच्छतेकडून समृद्धी कडे जाण्यासाठी सुरुवातीला अपयश आले. श्री औंधच्या यमाईदेवीचा आशीर्वाद पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने त्याची ही त्यांनी फिकीर केली नाही.शेवटी यशाला त्यांच्या जवळ यावे लागले.
संकट समयी खटाव-माण तालुक्यातील जनतेसाठी मोफत धान्य, पाण्याच्या टाक्या व मुक्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला. आमदार म्हणून सातारा-सांगली जिल्ह्यात विकास कामे करून दाखवली. यामध्ये कोणताही राजकीय स्वार्थ पाहिला नाही. सातारा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात औद्योगिक क्रांती व्हावी. सर्वाना रोजगाराची संधी मिळाली पाहिजे. त्याशिवाय ग्रामीण भागात प्रगती होणार नाही.
म्हणून औद्योगिकीकरणासाठी कण्हेर धरणातून २१ एम.एल.टी. जलसाठा राखीव ठेवण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. त्यात त्यांना यश आले. खटाव तालुक्यासाठी औद्योगिक वसाहत मंजूर करुन घेतली आहे.पण, त्याठिकाणी अध्याप उधोग सुरू झाले नाहीत. ते लवकर व्हावेत यासाठी बोलणी होत आहे. एक दिवस याठिकाणी उधोग नगरी उभी राहील असा त्यांना विश्वास वाटत आहे.
आपल्या जन्म भूमीत हक्काचा साखर कारखाना असावा हे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न त्यांना झोपू देत नव्हते. ते पूर्ण करण्यासाठी प्रभाकर घार्गे साहेब, मनोज घोरपडे व संग्राम घोरपडे या तिघांनी पडळ माळरानावर खाजगी साखर कारखाना उभारणी केली. सन २०२१-२२ या वर्षात साखर कारखान्याने या वर्षात विक्रमी आठ लाख ऊसाचे क्रशींग करुन उसाचे व वाहतुकीचे पैसे शेतकऱ्यांना वेळेत दिले. चालू वर्षी बिस्लेरी प्रकल्प उभारणीचे काम चालू केले आहे.
१९६६ साली म्हणजे ६६ वर्षांपूर्वी खटाव तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार कै. केशवराव पाटील (आण्णा) यांनी ग्राहक संघ उभा केला होता. आज घार्गे साहेबांच्या दुरदृष्टीने ग्राहक संघाची सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात केशवराव पाटील व्यापारी संकुलाची तीन मजली इमारत उभी करुन संस्थेचे उत्पन्न वाढविले आहे. सकारात्मक व व्यापक दृष्टीकोण ठेवून संघाची बिनविरोध निवडणूक झाली. सर्वानुमते श्री घार्गे साहेबांची पुन्हा एकदा चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे.
औद्योगिकरण तसेच शिक्षणाकडे महत्व देऊन दिले होते. पळशी गावात पालक व ग्रामस्थांच्या आग्रहाखातीर सुसज्य असे विद्यालय उभे केले. ते स्वखर्चाने चालवित आहेत. इतकेच काय तर केशवराव पाटील यांनी सुरु केलेले अनंत इंग्लीश स्कुल, सातारा पॉलिटेक्निक सातारा, फार्मसी कॉलेज, कटगुण येथील आश्रमशाळा आहेत. शेती हा आवडता विषय असल्याने शेती व शेतीपूरक व्यवसाय वाढीसाठी विविध प्रयोग करत असतात. त्यांच्या शेती निष्ठेमुळे राज्यातील सिताफळे विदेशात निर्यात झाली आहेत. तसेच परदेशी दौरे करून आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याचा शेती साठी उपयोग केला आहे.
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी विक्री संघ, नगरपंचायत, ग्रामपंचायत या सर्व सहकारी संस्था एका विचाराने एकत्र ठेवण्यासाठी त्यांनी सहकार्याची भावना जपली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व पक्षीय कार्यकर्त्यानी एकजुटीने श्री घार्गेसाहेब यांचा प्रचार करून त्यांना विक्रमी मतांनी संचालक केले आहे.ग्रामीण भागातील विकास सोसायटीच्या प्रगतीसाठी काळजीपूर्वक लक्ष घालून सोसायटी फायद्यात आणण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत.
सातार्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे तीन स्टार हॉटेल प्रिती एक्झीक्युटीव्ह म्हणजे सातारा-कोल्हापूर महामार्गावर सातारा नजिक जेवण व राहण्याचे उत्तम ठिकाण ठरले आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णय या हॉटेल मध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत.त्यांची पत्नी सौ. इंदिराताई घार्गे व दोन कन्या तसेच नातेवाईक, जिवाभावाचे कार्यकर्ते यांची मोलाची साथ मिळत असल्याने त्यांनी यश संपादन करून दाखविले आहे.
अजून भविष्यात खूप मोठी मजल मारण्यासाठी त्यांना जेष्ठांचा आशीर्वाद, सहकाऱ्यांचा पाठींबा मिळात आहे. संकटात सापडलेल्या श्री घार्गे साहेबांनी स्वतःला सिध्द करून कायद्याचे उल्लंघन न करता राज्यघटनेचा आदर राखला आहे. त्यांच्या बाबत अनेकांना सहानुभूती असली तरी कायद्याप्रमाणे जे घडले ते अंतिम सत्य लवकरच सर्वांच्या समोर येईल असा विश्वास व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.