राजेंद्रकुमार शेळके
पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी, हडपसर महाविद्यालयाच्या प्राचार्या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्तव्यदक्ष प्रा. अश्विनी प्रीतम शेवाळे यांनी औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमांतर्गत फार्मास्युटिकल सायन्स या विषयामधून Development and Validation of Stability indicating assay methods of drugs acting on Respiratory track disorders या विषयावर डॉ. मोहित चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले आहे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम युनिव्हर्सिटी, इंदोर येथून त्यांना पी.एच.डी. प्रदान करण्यात आली. प्राचार्य अश्विनी शेवाळे या “औषधनिर्माणशास्त्र” शाखेत २२ वर्षे अध्यापन करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ३० शोध निबंध तसेच ६ पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या नावावर ५ पेटंट आहेत. फार्मसी क्षेत्रातील डिप्लोमा व बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी त्या नेहमी सक्रिय राहून काम करतात. शैक्षणिक व सामाजिक कार्यात त्या कायम अग्रसेर असतात.