युनूस तांबोळी
शिरूर, (पुणे) : कवठे येमाई (ता. शिरूर) येथे नुकतेच शरद पवार गटाचे राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भिमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम हे नेहमी अभ्यास पुर्वक भाषण शैली मुळे ओळखले जातात. त्यातून आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघात शिरूर तालुक्याची ३९ गावे नसून नव्याने ४२ गावांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार नेहमी म्हणतात की तुम्ही कोणत्या गटाचे तेव्हा आम्ही छातीठोक पणे सांगतो की आम्ही शरद पवार राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे. लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे सभापती करतो…अध्यक्ष करतो…अशा आमिषाला मी भुलणार नाही. आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारे आहोत. गेल्या काही दिवसांच्या आकडेवारी नूसार शेतकऱ्यांचा विकास झाला की तोटाच झाला. हे तुम्हाला सांगू शकतो. शेतीला पाणी मिळाल्याशिवाय शेती व्यवसाय करता येणार नाही. त्यात परखड भुमीका असली पाहिजे. असे म्हणत नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची पिकांच्या तोट्याची आकडेवारी सांगितली.
टोमॅटो साठी एप्रिल मे मध्ये ५ लाख ट्रे आले तेव्हा २५० रूपये, जून मध्ये ९लाख ट्रे आले १०० ते १००० रूपये, जुलै मध्ये ४ लाख ट्रे आले ५०० ते २२०० रूपये बाजारभाव मिळाला. त्यानंतर सरकारने टोमॅटो आयात केली. म्हणून आगस्ट, सप्टेंबर, आक्टोंबर मध्ये होत्याच नव्हत झाल. त्यातून शेतकऱ्यांनी टोमॅटो बागा सोडून दिल्या. ५० कोटी रूपयांचे नूकसान शेतकऱ्यांचे झाले. कांद्याचे बाजारभाव पहाता निर्यातशुल्क या सरकाने लावले. त्यातून २४१० रूपये प्रमाणे कांदा खरेदी करणार हे सरकार चे धोरण होते. सरकारच्या धोरणामुळे कांद्याची निर्यात थांबली त्यातून शेतकऱ्यांच नूकसान झाले.
नारायणगाव, मंचर, खेड व शिरूर या बाजार समितीच्या अहवाला प्रमाणे एकट्या कांद्यात ११०० कोटी रूपयांचे शेतकऱ्यांचे नूकसान झाले आहे. याला जबाबदार कोण ? असा आमचा खडा सवाल आहे. दुग्धव्यवसायात देखील ३५ रूपये जाणारे दुध सध्या २७-२९ रूपयांपर्यत विकले जाते. हे देखील शेतकऱ्यांचे नूकसान आहे. जुलै महिण्यात आपल्यातली माणस राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षातून सोडून दुसऱ्या पक्षात गेली. ती शेतकऱ्यांचा विकास करण्याकरीता मग गेल्या काहि दिवसापासून या मतदार संघात कोटी रूपयांचे शेतकऱ्यांचे झाले आहे. मग विकास करण्यासाठी पक्ष सोडला त्यात शेतकऱ्यांचा तोटा का होतोय.
ऊसाला पाणी पट्टी एकरी १० पट वाढविण्यात आली असून एकरी साडेचार हजार पाणी पट्टी भरावी लागणार आहे. दिवसा विज देत नसल्याने सरकार दरबारी आवाज उठविण्याचे काम करण्यात येईल. चार तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात १३ शेतकरी मृत्यू तर ४३ जखमी, १३०० जनावरे मारली गेली. शिरूर तालुक्यातील शेतीला पाणी मागणारी १२ गावांचा पाणी प्रश्न भेडसावतो आहे. त्यासाठी विशेष मार्गदर्शन करायला पाहिजे.
दरम्यान, थिटे बंधाऱ्याची क्षमता वाढू शकते. असे वेगवेगळे प्रश्न सुटू शकतात. त्यासाठी तुमची सर्वाची साथ पाहिजे. त्यातून ओरीजनल राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्ष मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. असे निकम यांनी सांगितले. त्यावर मात्र चांगल्याच टाळ्यांनी प्रतिसाद मिळाला.