Health Tips: पुणे प्राईम न्यूज डेस्क : दातांची काळजी घेण्याचा सल्ला डेंटिस्ट अर्थात दातांच्या डॉक्टरांकडून दिला जातो. पण याच दातांची घरात राहूनच काळजी घेता येऊ शकते. अशा काही गोष्टी आहेत त्याचा अवलंब केल्यास दाताचं आरोग्य चांगलं राहतं. पण तुम्हालाही दातांची काळजी कशी घ्यावी हे माहिती नसेल तर हे तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.
दातांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. तसे न केल्यास नंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यासाठी दातांवर जेवणाचे कण अडकू न देणं, सकाळी आणि रात्री नियमित दात घासणं, जेवणानंतर व्यवस्थित चूळ भरणं, डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीनेच दात स्वच्छ करणं या सर्व गोष्टींमुळे दातांवरचे जेवणाचे कण निघून जातात. जर दातांतील जेवणाचं कण साठून राहिले तर त्याला फूड लॉजमेंट होऊ शकते.
जास्त गोड खाणे टाळणे आणि आहारात कमी साखर असणे हे महत्त्वाचे असते. आहारात साखर ही कमी किंवा जास्त प्रमाणात असते. पण दातावर साखरेचे प्रमाण फार काळ राहिल्यावर, त्यावर ‘बॅक्टेरिया’ होण्याच्या शक्यता असतात. ही बॅक्टेरिया, दातांची सळसळ, दात किडणे ही समस्या आणि बऱ्याच काही समस्या निर्माण करू शकतात.
भरपूर पाणी प्यावे
भरपूर पाणी प्यायल्यावर, दातांवरचे आम्लयुक्त पदार्थ कमी होण्यास मदत होते. जास्त पाणी प्यायल्याने लाळेचे प्रमाणही वाढते. जे दातांना ‘प्लेक्यू’ आणून किडन्यापासून दूर ठेवते. पाणी प्यायल्यावर ‘तोंड कोरडे पडणे’ अशा प्रकारची समस्याही कमी होऊ शकते.