मुंबई : सध्या स्मार्टफोनच्या युगात इंटरनेटशिवाय माणूस राहू शकत नाही, असं झालंय. विविध नेटवर्क कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या स्कीम्स् आणत आहेत. तर काही कंपन्या आपल्या ग्राहकांना चांगली इंटरनेट सेवा देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तरीही कधीतरी इंटरनेट अचानकच स्लो होतं आणि चांगलाच मनस्ताप होतो. (Internet Setting)
आता जरी तुमचं इंटरनेट स्लो झालं तरीही काही सेंटिग्ज आहेत त्याचा वापर केल्यास चांगली इंटरनेट सेवा तुम्हाला मिळू शकते. त्यासाठी स्मार्टफोनमधील नेटवर्क रिसेट करावं लागेल. ते करण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनला एअर प्लेन मोडवर टाकून नेटवर्क ऑन किंवा ऑफ करु शकता. यामुळे नेटवर्क रिफ्रेश होऊन जाते. त्यामुळे तुमची इंटरनेट स्लोची समस्या देखील सुटू शकते.
तसेच काही वेळा आपला फोन केवळ एका रिस्टार्टने देखील पूर्ववत होऊ शकतो. नेटवर्कशी संबंधित अडचणी असल्यास त्या दूर होऊ शकतात. फोन रिस्टार्ट केल्यास नेटवर्कला फ्रेश कनेक्शन मिळून आपल्या फोनच्या इंटरनेटचा स्पीड वाढू शकतो.
सॉफ्टवेअर अपडेट करणंही महत्त्वाचं
इंटरनेट स्लो होण्याच्या कारणांपैकी एक म्हणजे तुमचा स्मार्टफोन सॉफ्टवेअर अपडेट असावा लागतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेट झाले आहे का? हे सतत तपासायला हवे. जर नसेल तर सॉफ्टवेअर अपडेट करून घ्यावे. त्याने काही समस्या नक्कीच सुटू शकतात.