अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. गुहा गावात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे गावाला छावणीचं स्वरुप आलं आहे. याबाबात टीव्ही 9 मराठीने वृत्त दिले आहे.
अधिक माहिती अशी की, गुहा गावात वास्तू मंदिर आहे का मशीद? असा वाद कोर्टात खूप दिवसापासून प्रलंबित आहे. दरम्यान, गुहा गावात पूजेवरून दोन गट एकमेकांना भिडले, याच पार्श्वभूमीवर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला आहे.
या वादच नेमकं कारण काय?
गुहा गावात दर्गा आणि मंदिराचा वाद असल्याचं बोललं जात आहे. त्या ठिकाणी दर्गा आहे, असा एका समाजाचा दावा आहे. तर दुसऱ्या समाजाकडून तिथे मंदिर असल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबतच वाद हा गेल्या तीन वर्षांपासूनचा आहे. तिथे दोन्ही समाजाच्या पुजाऱ्यांकडून पूजा केली जाते. शासनाने अमावस्येच्या दिवशी पूजा करण्यासाठी परवानगी दिली होती.
त्यानुसार अमावस्येच्या निमित्ताने पूजा झाल्यानंतर तिथे कीर्तन पार पडत होतं. कीर्तनच्या आवाजावरुन सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, त्यानंतर त्याचं परिवर्तन दोन गटात मारहाणीत झालं. याबाबतचा वाद तीन वर्षांपासून कोर्टात प्रलंबित आहे. तरीही दोन्ही समाज सतत आक्रमक होत आहेत. या मुद्द्यावरुन अनेक मोर्चे निघाले असून अनेकवेळा हाणामारीच्या घटना देखील आ