Grammy Awards 2024 : पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी लिहिलेल गाण ‘एबंडेंस इन मिलेट्स’ ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट झालं आहे. धान्याचे फायदे जास्तीत जास्त लोकांना कळावेत यावर आधारित त्यांचं लिहिलेल हे गाण ‘एबंडेंस इन मिलेट्स’ आहे. युट्यूबवर हे गाणं प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं ‘एबंडेंस इन मिलेट्स’ या गाण्याला जागतिक पातळीवरील संगीतक्षेत्रात महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. त्यामुळे ते आता विशेष चर्चेत आहे. या गाण्याला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे. बाजरीसारख्या पौष्टिक धान्याचा प्रचार व्हावा यासाठी त्यांनी हे गाणं लिहिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार धान्याचं सेवन केल्याने आरोग्य उत्तम राहते आणि शरीर तंदुरुस्त राहायला मदत होते. बाजरीसारखं धान्य हे खूप पौष्टिक आहे. तसेच आरोग्यदायी आहे. अन्न सुरक्षा देण्याच्या आणि उपासमारी दूर करण्याच्या महत्त्वाच्या ध्येयाला या गाण्यातून सर्जनशीलतेची जोड मिळाली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
ग्रॅमी पुरस्कार विजेती भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाहच्या मदतीने पंतप्रधानांनी हे गाणं लिहिलं आहे. ‘एबंडेंस इन मिलेट्स’ या गाण्याबद्दल बोलताना फाल्गुनीने ट्वीट केलं होतं की,”धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी, शेतकर्यांना या पिकांचे उत्पादन घेता यावे यासाठी आणि जगातील उपासमार संपवण्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानांसोबत हे गाणं लिहिलं आहे”. पंतप्रधानांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केलं आहे.