Amazon Layoffs : नवी दिल्ली : अॅमेझॉनने म्युझिक विभागातील कर्मचार्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी कर्मचारी कपातीची घोषणा करण्यात आली आणि लॅटिन अमेरिका, उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कर्मचार्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. अॅमेझॉनने गेल्या महिनाभरात स्टुडिओ, व्हिडिओ आणि म्युझिक विभागांमधील नोकऱ्या कमी केल्या आहेत. २७ हजार कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम दिसून येणारे. सुदैवाने याचा परिणाम भरतातील नोकऱ्यांवर पहायला मिळाला नाही.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, डिसेंबर 2022 पर्यंत अॅमेझॉनने एकूण 15.4 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यातील सर्वात मोठी संख्या अशा कर्मचाऱ्यांची आहे जे वेअरहाऊस आणि शिपिंग उत्पादनांमध्ये काम करतात. याशिवाय कंपनीत सुमारे 35,000 कॉर्पोरेट कर्मचारी आहेत. कंपनीने गुंतवणूकदारांना लिहिलेल्या पत्रात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांनी सांगितले होते की, कर्मचार्यांना काढून टाकण्याचा निर्णय कंपनीसाठी कठीण आहे. परंतु भविष्यात चांगल्या गुणवत्तेसाठी हे एक आवश्यक पाऊल आहे. ते म्हणाले होते की ते वेगवेगळ्या विभागांच्या कामावर नियंत्रण ठेवत आहेत आणि ज्या व्यवसायातून आम्हाला फारसा नफा मिळत नाही ते व्यवसाय बंद करणार आहोत.
18,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले
मार्चमध्ये, ऍमेझॉनने आपल्या क्लाउड सेवा, जाहिराती आणि ट्विच युनिट्समधून मंदीच्या भीतीने सुमारे 18,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. नंतर काही आठवड्यांनंतर सीईओ अँडी जॅसी यांनी कर्मचाऱ्यांना मेमोद्वारे ही घोषणा केली.
बायजूमधून 600 कर्मचारी काढून टाकले
अडचणीत सापडलेली एडटेक कंपनी बायजूने देखील ऑक्टोबरमध्ये कंटेंट आणि मार्केटिंग टीममधून सुमारे 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाचा मार्केटिंग टीमपेक्षा कंटेंट आणि व्हिडिओ टीमवर जास्त परिणाम झाला. कंटेंटचा भाग असलेल्या शिक्षकांना देखील या निर्णयाचा फटका बसला आहे.