पंढरपूर : पंढरपुरात कार्तिकी एकादशीला महापूजेसाठी राज्याच्या दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नसल्याची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पूजेचा मान मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान कोण विठ्ठल रखुमाईची पूजा करणार या चर्चांना उधाणा आले होते. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.(Ajit Pawar)
दरम्यान, कार्तिकी एकादशीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी नेमकं कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला बोलावयाचे या संदर्भात आज मंदिर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कार्तिकी एकादशी या सोहळ्याची चर्चा झाली. राज्यभरात सुरु असलेलं मराठा आंदोलन अधिक तीव्र होत होत असताना दिसत आहे.(Devendra Fadanvis)
पंढरपुरातील कार्तिकी एकादशीवरही मराठा समाजाच्या आंदोलनाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मराठा समाजाकडून मंदिर समितीला एक पत्र देण्यात आलं होतं. या पत्राद्वारे आरक्षण द्या. नाहीतर कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू दिली जाणार नाही, असा इशारा मराठा सामाज्याकडून देण्यात आला होता. या पत्राचा धसका घेत मंदिर समितीने अखेर हा निर्णय घेतला आहे.