पुणे : इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौर आणि पवन ऊर्जा आधारीत चार्जिंग प्रणाली विकसित करण्यासाठी भारतात इलेक्ट्रिक हायवे लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
केंद्र सरकार प्रोत्साहन दिले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर ट्रकसारखी अवजड वाहने आणि बसला न थांबताच चार्जिंग करणं सुलभ होणार आहे. पेट्रोल आणि डिझेल अगदी सीएनजीचेही गेल्या काही महिन्यांमध्ये झपाट्याने दरवाढ झाली. त्यानंतर रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौर आणि पवन ऊर्जा आधारीत चार्जिंग प्रणाली विकसित करण्यासाठी भारतात इलेक्ट्रिक हायवे लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी यांनी सोमवारी केली आहे.
दरम्यान, यामुळे आता महामार्गावर अवजड मालवाहतूक करणारे इलेक्ट्रिक ट्रक आणि बस यांचं चार्जिंग होऊ शकेल अशी माहिती गडकरांनी दिली. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौर आणि पवन ऊर्जा आधारीत चार्जिंग प्रणाली विकसित करण्यात केंद्र सरकार प्रोत्साहन देतंय. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर ट्रकसारखी अवजड वाहने आणि बसना न थांबताच चार्जिंग करणं सुलभ होणाराय..