पुणे : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत विक्रम करत आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 45 कोटींची कमाई केली आहे. ब्रह्मास्त्रने पहिल्या वीकेंडमध्ये भारतात 125 कोटींची कमाई केली आहे. त्यानुसार ब्रह्मास्त्र हा गेल्या 6 वर्षात पहिल्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यासोबतच चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 225 कोटींची कमाई केली आहे.
ब्रह्मास्त्रचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने दोन दिवसांचे कलेक्शन शेअर करत आनंद व्यक्त केला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘या जगात प्रेमापेक्षा मोठे ब्रह्मास्त्र नाही.’ सोबतच अयानने प्रेक्षकांचे आभार मानत या वीकेंडला थिएटरला भेट देऊन तुमचे प्रेम दाखवल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार, असे म्हटले आहे.
अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रची भारताबरोबरच परदेशातही चांगली कमाई होत आहे. या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवसाच्या कमाईत 10 कोटींची भर घालत चित्रपटाने 85 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या व्यवसायात घसरण बघायला मिळाली. तिस-या दिवशी चित्रपटाने 65 कोटींची कमाई केली आहे.
अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्रचे एकुण बजेट 410 कोटी आहे. भारतात या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 36 कोटी होते. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 6 कोटी अधिक म्हणजे एकुण 42 कोटी कमावले. त्याच वेळी, तिसर्या दिवशी कमाईत 45 कोटी म्हणजेच 3 कोटींची वाढ झाली आहे. अशा स्थितीत ब्रह्मास्त्र हा रणबीरचा गेल्या 6 चित्रपटांपैकी पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
येत्या 2 दिवसांत हा चित्रपट 300 कोटींचा टप्पा गाठेल. या चित्रपटात रणबीर-आलियाशिवाय नागार्जुन, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.