पुणे : पुण्यात खून, बलात्कार, अपहरण, दरोडा, मारामारी, चोऱ्या यांसारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार घडत आहेत. हे असतानाच सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यात आता बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वडगाव शेरी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीतून समोर आली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी १९ वर्षीय पीडित तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी ५१ वर्षीय नराधम पित्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पिडीत मुलगी रविवारी (ता.११) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घरात दोघेच होते. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीसोबत अश्लील चाळे केले. तसेचपिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पीडित मुलीने कशीबशी सुटका करून घेतली.
दरम्यान, याप्रकरणी १९ वर्षीय पीडित तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर नराधम पित्या विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.