अजित जगताप
सातारा : ‘एकच वादा, राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकनिष्ठ धैर्यशील पाटील दादा’ या जयघोषात सातारा जिल्ह्यासह माण-खटाव तालुक्यात मनसे ऑनलाईन नोंदणीने विक्रम केला आहे.त्यामुळे भविष्यात मनसे चे रेल्वे इंजिनमुळे आता पासूनच अनेकांना धडकी भरली असल्याचे दिसून येत आहे.
मनसे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या अतिशय उत्कृष्ट कामगिरीमुळे लोकांच्या समस्या सोडवून त्यांना संकटसमयी मदतीचा हात पुढे केला होता. याची जाणीव ठेवून मनसे सदस्य नोंदणीला ग्रामीण व निमशहरी भागात जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
आज माण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागरूक असलेल्या पळशी गावात मनसे ऑनलाईन सदस्य नोंदणी व शाखा उदघाटन समारंभ मोठ्या उत्साहात घेण्यात आला. यावेळी उपस्थित मनसे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील,उपाध्यक्ष अमोल खाडे,शाखा अध्यक्ष अविनाश भोसले, पळशी शाखा अध्यक्ष सुरेश गंबरे, सुनीता शिंदे, अंकुश गंबरे, हनुमान खाडे,सागर कट्टे,स्वप्नील कोळी, शुभम रणपिसे, धनराज जाधव,शुभम खाडे, अनिल बागाव,अविनाश देवकुळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मनसैनिकांना मार्गदर्शन करताना जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील म्हणाले की, युवक व तरुणांची साथ मिळाली आहे. लोकांनी आता बदल घडवून आणला आहे.त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना माण खटाव मधील एक नंबरचा राजकीय पक्ष बनला आहे. बघताय काय?सामील व्हा चा नारा बुलंद करण्यात आला आहे. त्यासाठी श्री पाटील यांनी अहोरात्र कष्ट करण्याची तयारी देखील ठेवली आहे.
मनसे पक्ष वाढविण्यासाठी नव्हे तर जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी देखील कटिबद्ध राहीन. माण खटाव मधील प्रत्येक गावात मनसे पदाधिकाऱ्यांची फौज उभा करून भक्कम व निस्वार्थी मनसैनिकांची शाखा गावोगावी उभ्या राहिल्या पाहिजेत. असा जेष्ठांचा आशीर्वाद लाभत आहे. मनसे अध्यक्ष सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांनी श्री पाटील यांच्या सारख्या सामान्य मनसे सैनिकांवर मोठी जबाबदारी दिली आहे. ती मनसैनिकांच्या जीवावरच सार्थ करून दाखवून दिली आहे.
या कार्यक्रमाने मनसे ची हवा निर्माण झाली असून भविष्यात माण-खटाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ची दमदार एंट्री होईल. असा अंदाज बांधला जाऊ लागला आहे.