Mumbai News : मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसह मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने ‘महाराष्ट्र बंद’ असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्याने गोंधळ उडाला आहे. सोमवारी राज्यभर आंदोलन, उपोषण, जाळपोळीचे प्रकार घडल्यानंतर आज मराठा आरक्षणासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, मराठा समाजाकडून ‘बंद’ची हाक देण्यात आलेली नाही. महाराष्ट्र बंदचा कोणताही संदेश जरांगे पाटलांकडून आलेला नाही, असा खुलासा करण्यात आला आहे.
पोलिसांचे अफवा न पसरवण्याचे आवाहन
‘मराठा बंद’ची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने अनेकांचा गोंधळ उडाला. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही संभ्रम निर्माण झाला. (Mumbai News ) अखेर व्हायरल होत असणाऱ्या मेसेजवर मराठा समाजाने भूमिका मांडली आहे. ‘महाराष्ट्र बंद’चा कोणताही मेसेज जरांगे पाटलांकडून आलेला नाही. सर्वच जिल्ह्यात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोबतच पोलिसांकडून अफवा न पसरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील सध्या संचारबंदी लागू केली आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. (Mumbai News ) तर मराठा समाजाच्या वतीने सातारा जिल्हा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. हे तीन जिल्हे वगळता कोठेही बंद नाही. बंदची अफवा पसरवण्यात आली आहे.
दरम्यान, सातारा येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही, तोपर्यंत शेळत न जाण्याचा निर्धार केला आहे. (Mumbai News ) गावातील पहिली ते नववीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनूचित घटना घडू नये, यासाठी कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बस बंद करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत बसची सेवा बंद राहणार आहे. (Mumbai News ) धाराशिव रेल्वे स्टेशनवर मराठा समाजाने आंदोलन पुकारले आहे. मराठा आंदोलकांकडून ‘रेल्वे रोको’चा प्रयत्न करण्यात आला आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : विमानात बसला, छातीत दुखतंय म्हटला; इमर्जन्सी लँडिंग होताच भलतंच बोलला