पुणे – भारतीय रिझर्व्ह बँकेने रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. या सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल, उत्पन्नाची शक्यता नाही आणि नियमांचेही उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने हि कारवाई केली आहे. पुणे स्थित रुपी को-ऑपरेटिव्ह बँक २२ सप्टेंबरपासून बँक बंद होणार आहे.
जर तुमचेही बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यावश्यक आहे. या बँकेचे कामकाज २२ सप्टेंबरपर्यंत चालू असणार आहे, त्यानंतर तिचे कामकाज बंद करेल. त्यानंतर ग्राहक या बँकेत पैसे जमा करू शकणार नाहीत, तसेच बँकेतून पैसे काढू शकणार नाही. तसेच कुठलाही व्यवहार करू शणार नाहीत.
दरम्यान, बँकेत ठेवी असणाऱ्या ठेवीदारांना बुडीत ठेवींच्या प्रमाणात ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.