Pune News : दिवाळीत अनेकजनांचा ऑनलाइन खरेदीवर भर असतो, बऱ्यापैकी लोक ऑनलाइन खरेदी करतात. तर सुशिक्षित बेरोजगार ऑनलाइन नोकरी शोधतात. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद देतात, अशावेळी फसवणुकीची जास्त प्रमाणात असते. त्यामुळे नागरिकांनी सायबर फ्रॉडपासून दूर राहण्यासाठी नेमके काय करावे, यासंदर्भात सायबर पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सतर्क राहण्याचे आवाहन…
आपल्या ओळखीतील मित्र ते फोटो- व्हिडिओ पाहू शकतील, असे सेटिंग असावे. क्विक सपोर्ट, टीम व्ह्यूवर, एनी डेस्क असे मोबाईल ॲप डाऊनलोड करू नयेत, असेही पोलिसांचे आवाहन आहे. डेबिट, क्रेडिट कार्डचे नंबर व पासवर्ड घरात एका रजिस्टरमध्ये लिहून ठेवावेत, मोबाईलमध्ये ते साठवू नयेत, असाही मोलाचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
फसवणूक झाल्यानंतर काय करावे?
ऑनलाइन फ्रॉड तथा फसवणूक झाल्यास संबंधिताने सकाळी १० ते सायंकाळी सहापूर्वी ‘१९३०’वर फोन करून माहिती द्यावी. तसेच यावर मेल पाठवावा, असेही सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
सायबर पोलिस म्हणतात…
नोकरी तथा काम हवे असल्यास स्वतः संबंधित कार्यालयात जाऊन चौकशी करावी. अनोळखी व्यक्तीची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारू नका. काही व्यक्ती स्वतःहून आपल्या बँक अकाऊंटमध्ये पैसे पाठवून फसवणूक करतात. त्यांना परत त्यांच्या आयएफसीएस कोड व फक्त बँकेचा खाते क्रमांक विचारून त्यावर पैसे पाठवा.
पोलिसांना भेटूनही त्यासंबंधीची कार्यवाही करता येईल. पैसे पाठविण्यासाठी थर्डपार्टी ॲप वापरण्याऐवजी फक्त बँकेचे क्यू आरकोड वापरून पैशांची देवाण-घेवाण किंवा व्यवहार करावा.
अनोळखी क्रमांकावरील कॉलवर डेबिट तथा क्रेडिट कार्डची ‘केवायसी’बद्दल माहिती देऊ नये
मोबाईलवरील अश्लील तथा अनोळखी लिंक उघडू नये.
ऑनलाइन डिलिव्हरी ॲप बघू नयेत, ऑर्डर देताना कॅश-ऑन डिलिव्हरी करा.
सोपा पासवर्ड ठेवू नका आणि दर तीन महिन्याला तो बदला. डेबिट व क्रेडिट कार्डवरील ‘सीसीव्ही’ लपवावा.
क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू नका.
मित्रांच्या लिंकला उघडून आपला ईमेल आयडी टाकू नका. तसेच काही महिने न वापरलेले मोबाईलमधील ॲप हटवावेत.
नागरिकांनी सतर्क राहिल्यास फसवणूक टळेल.