पुणे : आपल्या शरीरातील छोट्यातला छोटा अवयव, भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. मग ते नखं असो किंवा डोक्यावरचे केस. त्याची काळजी घेणे गरजेचं असतं. पण काही महिलांना नखे वाढवण्याची सवय असते. त्यानुसार, केवळ आवड म्हणून अनेक महिला नखं वाढवत असतात. मात्र, तुम्हाला माहितीये का असं करणं अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं.
जास्त नखं वाढवली तर आरोग्यावर वाईट परिणाम होतो. नखं स्वच्छ न केल्यामुळे आणि नखं न कापल्यानं, बाहेरील घाण, जंतू आणि धूळ त्यामध्ये जाऊ शकते. बोटांच्या नखांची नीट काळजी घेतली नाही तर त्यामुळे अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. व्यक्तीच्या लांब नखांमध्ये 32 पेक्षा जास्त जीवाणू आणि बुरशीच्या 28 पेक्षा जास्त प्रजाती असू शकतात. त्यामुळे, जर तुमची नखे लांब असतील, तर त्यांची वेळोवेळी स्वच्छता करत राहणे गरजेचे आहे.
नखांमध्ये जंतू असतात. त्यामुळे पिनवर्म्स आणि इतर आजार होण्याचा धोका वाढतो. हात नीट न धुतल्यामुळे हे बॅक्टेरिया नखांमध्ये राहतो. नंतर तो पोटात जाऊ शकतो. त्यामुळे नख वाढल्यानंतर ती कापावीत. आर्टिफिशियल नखांचा वापर जास्त वेळ करु नका. ज्या हात्यांच्या नखांना नेलपेंट लावली आहे, त्या हातानं जेवण करु नका, असे करणे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरू शकतं.