पुणे, ता.२९ : घरात जर आपलं कोण वयोवृद्ध, ज्येष्ठ व्यक्ती असेल तर त्यांची काळजी कशी घ्यावी, हा अनेकांना प्रश्न असतो. पण वयोमानानुसार लोक शारीरिकदृष्ट्या कमकुवत होतात. यामुळे यांची काळजी घेणे आवश्यक असते. त्यांची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसे केल्यास ज्येष्ठांना फायदा होऊ शकतो.
नियमित झोप महत्त्वाची
वृद्धत्वाबरोबर वृद्धामध्ये झोप न येण्याची समस्या अधिक जाणवते. या वयात झोप कमी झाल्याने हृदय आणि मेंदूशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. शक्य असल्यास व्यायाम आणि ध्यान करावे.
व्यायाम करण्यास प्रोत्साहन द्यावे
शारीरिक व्यायाम हा सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी फायदेशीर ठरतो. शारीरिकदृष्ट्या सक्रिय असल्याने शरीरावर वयाचा प्रभाव कमी करतो. वृद्ध लोकांनी व्यायाम केल्यास त्यांचे आरोग्य निरोगी राहते. यामुळे शरीराचे संतुलन राखण्यास मदत मिळते.
संतुलित आहार द्यावा
वृद्ध लोकांचा आहारात चरबीयुक्त गोष्टी कमी असाव्यात आणि फायबरयुक्त गोष्टींचे प्रमाण जास्त असावे. यामुळे त्यांची पचनसंस्था चांगली राहते. या लोकांना आहारात फळे, हिरव्या भाज्याना प्राधान्य द्यावे. वृद्ध लोकांमधील आजार कमी होण्यासाठी संतुलित आहार देणे गरजेचे आहे.
नियमित शारीरिक तपासणी करावी
वृद्ध लोक जर घरात असतील तर ऑक्सिमीटर, बीपी मशीन, शुगर टेस्टिंग मशीन, नेब्युलायझर, थर्मामीटर इत्यादी गोष्टी घरात असणे आवश्यक आहे. जर मधुमेह आजार असेल तर नियमितपणे तपासणी करावी.